निधी मंजूर होऊनही मुचकुंदी नदीवरील गोळवशी वडद हसोळ पुलाच्या जोड रस्त्याचे डांबरीकरणाचे काम रखडलेले

मुचकुंदी परिसर विकास संघ संघटनेचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

संतोष कोत्रे
लांजा : मुचकुंदी परिसर विकास संघ, या संस्थेच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागलेल्या मुचकुंदि नदीवरील
गोळवशी ते वडद हसोळ पुलाच्या जोड रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ रखडलेले आहे. विशेष बाब म्हणजे या डांबरीकरणाच्या कामासाठी १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असतानाही हे काम प्रतीक्षेत आहे. त्यामुळे हे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी मुचकुंदी परिसर विकास संघाने केली असून बाबतचे निवेदन गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले.
लांजा आणि राजापूर तालुक्याला जोडणाऱ्या मुचकुंदी नदीवर गोळवशी वडद हसोळ पुल व्हावा यासाठी मुचकुंदी परिसर विकास संघ या संघटनेने पाठपुरावा केला होता. त्यानंतर हा पुल बांधण्यात आला होता. तर मुलाच्या दोन्ही बाजूच्या बॉक्सेल तसेच ३९० मीटर जोड रस्त्यासाठी एक कोटी चाळीस लाख एवढा निधी मंजूर झाला होता. पुलाचे काम पूर्ण झाले तरी पुलाच्या दोन्ही बाजूच्या जोड रस्त्याचे डांबरीकरण अद्यापही पूर्ण झालेले नाही. खडीकरण होऊन दोन पावसाळे उलटून गेले मात्र तरी डांबरीकरण अद्याप झालेले नाही. तसेच संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची हालचाली होताना दिसत नाही.
त्यामुळे सदर फुलाच्या जोड रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून डांबरीकरणाचे काम काकडीने मार्गी लावावे अशी मागणी मुचकुंदी परिसर विकास संघाच्या वतीने करण्यात आली आहे. सदर निवेदन सादर करताना संघाचे अध्यक्ष अजय मांडवकर, सचिव बलराम तांबे, पदाधिकारी गणेश खानविलकर,
रवींद्र कांबळे, मंगेश बापेरकर, दीपक ओंबळे, शंकर मांडवे आदी उपस्थित होते.