पं.स. सदस्य तथा भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद भुरण यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम
जिल्हा व तालुका प्रशासनातील मान्यवरांची उपस्थिती
चिपळूण (प्रतिनिधी) : अल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेली नैसर्गिक परिस्थिती आणि दिवसेंदिवस वाढत चाललेला उकाडा यामुळे पाणीसाठा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि उपलब्ध पाण्याचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने खेर्डी गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मुख्य नदीवर जलसंवर्धनांतर्गत आज दोन बंधारे बांधण्यात आले. पंचायत समितीचे विद्यमान सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद जयवंत भुरण यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवणे, भूजलपातळी वाढवणे तसेच परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या पाणीसाठ्याला आधार मिळवून देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गावातील पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी अशा जलसंवर्धनाच्या कामांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या उपक्रमावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही मनोज रानडे, जिल्हा परिषद सदस्या सौ. रावी मोरे, चिपळूण पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले, उपसभापती संदेश आयरे, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी सौ. ज्योती यादव, माजी सभापती सौ. स्नेहा मेस्त्री, नॅब आय चिपळूणचे अध्यक्ष निलेश भुरण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खेर्डी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष राजू जाधव, माजी तंटामुक्ती अध्यक्ष हरिश्चंद्र यादव व काशिनाथ दाते, माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण (बापू) राऊत, ग्रामपंचायत सदस्य विनय (बाळा) दाते, विश्वस्त सुधाकर दाते, अभिनव भुरण, अमोल महाडीक, श्रीधर भुरण, राकेश भुरण, मंगेश चिले, लक्ष्मण चिले, रमेश भुरण, रमेश चिले, संतोष उतेकर, रमेश दाते, तुकाराम चिले, सुभाष महाडिक, श्यामसुंदर शिंदे, सुरेश चिले, प्रदीप भुरण, सतीश पंडित, सुरेंद्र चिले, विल्सन रॉड्रिग्स, कैलास चिले, सागर चिले, संकेत चिले, प्रसाद वरेकर, सुशांत चिले, सुयोग चिले, मंथन चिले आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असलेल्या आजच्या परिस्थितीत नदीवर बंधारे उभारण्याचा हा उपक्रम जलसंवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे. गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समन्वयातून अशा उपक्रमांना चालना मिळाल्यास भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकते.या जलसंवर्धन उपक्रमाला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच गरुडझेप महिला प्रभाग संघ, खेर्डी अंतर्गत महिला बचत गटांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविला. जलसंवर्धनाच्या या सामाजिक उपक्रमात महिला बचत गटांचा सहभाग विशेष महत्त्वाचा ठरला. पाणी बचत, जलसंवर्धन आणि गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन, महिला संघटना व ग्रामस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्याचे यावेळी दिसून आले.













