चिपळूण जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने डॉ. मनीषा वाघमारे यांचा सत्कार

चिपळूण (वार्ताहर) : शहरामधील एक नामांकित डॉक्टर मनीषा वाघमारे यांनी सायकलच्या माध्यमातून विविध अनेक विक्रम केले आहेत. त्यांचा नुकताच जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने सत्कार करण्यात आला.
डॉ. वाघमारे यानी सात राज्यातून प्रवास करून हा विक्रम केलेला आहे. प्रत्येक राज्यातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा अनुभवही आला. वेगळं राज्य वेगळी संस्कृती, वेगळे जेवण सर्व काही त्याने ऍडजेस्टमेंट करून प्रवास केला.आपण चांगलं राहिलो तर जग हे आपल्याशी चांगलं राहतं हे त्यांचं वाक्य होतं. त्यानी त्यांचा अनुभव जिजाऊंच्या महिलांच्या समोर मांडला. प्रवासामधील आलेले चांगले व वाईट अनुभव आणि कोणत्याही परिस्थितीत आपण स्वतःला डगमगून न देता खंबीरपणे परिस्थितीला तोंड दिले पाहिजे, हा संदेश त्यांनी महिलांच्या समोर दिला. भारताच्या पूर्व सीमेपासून पश्चिम सेमी पर्यंत 3800 कि.मी. असा सायकल प्रवास केला . त्या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे. डॉक्टर मनीषा वाघमारे यांचा सत्कार करताना माजी कोकण मुंबई विभागीय कार्याध्यक्ष निर्मला जाधव, माजी तालुकाध्यक्ष प्राजक्ता सरफारे, माजी खजिनदार माधवी भागवत, उप तालुकाध्यक्ष विना जावकर, शहराध्यक्ष वर्षा खटके, उपशहराध्यक्ष स्मिता खंदारे, खजिनदार अपूर्वा गायकवाड, अनामिका हरदारे, सामाजिक कार्यकर्त्या दीपा हरदारे आदी महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या.