पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले नवीन कुर्ली येथे दुर्गादेवीचे दर्शन ! मंडळ आयोजकांचे कौतुक !

नवदुर्गा युवा मंडळाकडून जोरदार स्वागत करत सत्कार

 

 फोंडाघाट : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय श्री. नितेशजी राणे साहेब यांनी नवीन कुर्ली येथील नवदुर्गा युवा मंडळाच्या सार्वजनिक नवरात्रोत्सवाला भेट देऊन दुर्गादेवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीचे आशीर्वाद घेतले तसेच नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमासाठी मंडळाला शुभेच्छा दिल्या.

नवदुर्गा युवा मंडळ, नवीन कुर्ली यांच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२६ निमित्त पालकमंत्री नितेश राणे साहेब यांनी दुर्गादेवीचे दर्शन घेतल्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला. यावेळी मंडळाच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत करून नवरात्रोत्सवाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या भेटीमुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा जपत सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक वारसा वृद्धिंगत करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.

या भेटीप्रसंगी नवदुर्गा युवा मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि भाविक उपस्थित होते.