जयंतीदेवी रवळनाथ मंदिरात १८ ऑक्टोबर रोजी रंगणार ‘रंग तरंग’ विनोदी कार्यक्रम!

​मसुरे | झुंजार पेडणेकर
श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान येथे नवरात्र उत्सव २०२६ चे औचित्य साधून विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब तर्फे हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. ​या उत्सवा अंतर्गत १८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता प्रा. केशव बडे (बीड ) प्रस्तुत “रंग तरंग नकला व गाण्याचा विनोदी कार्यक्रम” संपन्न होणार आहे.

​ आकाशवाणी व दूरदर्शन हास्य कलाकार ह.भ.प. केशव महाराज बडे (बीड) हे एक उत्तम कीर्तनकार असून ते तोंडाच्या साहाय्याने विविध वाद्यांचे अप्रतिम आवाज काढून प्रेक्षकांचे खास मनोरंजन करतात. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचा विशेष उपक्रम सादर केला जात आहे.

​या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील सर्व भाविकांनी व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.