आंबा- काजू बागायतदार चिंतेत
फोंडाघाट : आज सकाळपासूनच प्रचंड उष्मा आणि ढगाळ वातावरण ! संध्याकाळी ६:३० वाजता विजांच्या कडकडाट आणि वादळ वाऱ्यासह सुमारे तासभर धुवांधार पावसाने, बाजारपेठेतील ग्राहक आणि शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.दुकानाचा आसरा घेऊन काही थांबले. तर रस्त्यावरील भाजी व्यापाऱ्यांची वाहून जाणारी भाजी, सावरताना त्रिधातिरपीट उडाली. शेतकऱ्यांची भात कापणी जोरात चालू असल्याने कापलेले भात सुरक्षित ठेवताना धांदल उडाली. कृषी विभागाने याची नोंद घ्यावी,अशी मागणी होत आहे.नेहमीप्रमाणे वीज खंडित झाली. मात्र पावसामुळे वातावरणात गारवा आला.येऊ घातलेल्या आंबा- काजू पालवीवर या पावसाचा विपरीत परिणाम होण्याची भीती बागायतदार मध्ये व्यक्त होत आहे..













