पंचक्रोशीत सरस्वती पूजन पालक संघ,पालक, शिक्षक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत उदंड उत्साहात !
केंद्र शाळा नंबर एक हवेली नगर माळवाडी आणि लोरे नरवाडी जिल्हा परिषद शाळेत उत्सव लक्षवेधी !
फोंडाघाट : कुमार नाडकर्णी
कोकणातील प्रत्येक शाळांसाठी आणि शाळेतील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांमध्ये नवचैतन्याचा पवित्र सण म्हणजे शारदोत्सव ! मोठ्या भक्तीभावाने आणि उदंड उत्साहात संपन्न झाला . सर्वजण रंगीबेरंगी अथवा ड्रेस कोड मध्ये सुंदर दिसत होते आणि सर्वत्र चैतन्यला उधाण आले.
फोंडाघाट केंद्र शाळा नंबर १
शिक्षण, अभ्यास, बुद्धिमत्ता आणि सुंदरतेची देवता सरस्वती ! सुंदर सजवलेल्या मकरामध्ये प्रशालेत सकाळीच सरस्वती मातेची विधिवत पूजा करून आरती झाली. तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील मुलांसाठी रंग भरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सर्वांनी सरस्वती स्तवन सह हरिनामाचा जयघोष केला. भजनामध्ये रममाण झालेल्या मुलांचे पालकही सामील झाले. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला प.स.सदस्य पवन भालेकर, सुरेश पेडणेकर, ग्राम. सदस्य प्राची धुरी,मिलिंद लाड, यांनी भेट देऊन कौतुक केले. पालक संघाचे दत्तात्रय रेवडेकर,समृद्धी हळदिवे, गजानन सावंत, वेदिका राणे, अपूर्वा गोसावी, वर्षाराणी गांगुर्डे, अस्मिता तावडे, निलेश सापळे, वासुदेव पारकर यांचे सह केंद्रप्रमुख वैभव तळेकर,मुख्या. श्रेया नानचे, रंजीता पाटील, वेदांति नारकर, अंगणवाडी च्या अनिता शिरोडकर, स्वाती सावंत, सविता इस्वलकर, वर्षा वायंगणकर, प्रियंका रेवडेकर, सुनीता भोगले, यांनी विशेष मेहनत घेतली..
प्राथ.शाळा माळवाडी- हवेलीनगर
एकीकडे इंग्लिश माध्यमाच्या शाळा कडे पालकांचा ओढा असताना, गुणवत्तेच्या आधारावर आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या, या जि.प.शाळेत सरस्वती मातेचा सोहळा अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. मिरवणुकीने शारदा देवीची मूर्ती प्रशालेत आणण्यात आली.शालेय ढोल- लेझीम आणि घोषणांनी परिसर दुमदुमला.सुंदर सजवलेल्या आसनावर मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. पूजा झाल्यानंतर सर्वांनी आरती करून तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर सरस्वतीच्या प्रांगणात रंगारंग विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. भक्ती गीतापासून ते शिवरायांच्या पोवाड्यापर्यंत नटलेल्या मुलामुलींनी आपल्या विविध कलागुणांचे दर्शन घडविले. याला उपस्थित पालक- ग्रामस्थ यांनी उदंड प्रतिसाद देत कौतुक केले. यावेळी शिक्षिका शितल बागवे,संगीता गोसावी, भाग्यश्री पाताडे,प्राची उरणकर,मयुरी मेस्त्री यांचे सह, पालक संघाच्या रोहिणी गावडा,प्राजक्ता रावराणे,पुनम नराम, सायली बंदरकर,प्रिया डफळे, राणी सोलकर गायत्री इस्वलकर यांनी उत्कृष्ट नियोजन केले. अभियंता पॅरिस उभयतांनी भेट देऊन मुलांचे कौतुक केले.
जि. प. शाळा लोरे-नरामवाडी
खेड्यात वाडीवरील कष्टकरी, कामकरी कौटुंबिक वातावरण असलेल्या जि. प. शाळा लोरे – नरामवाडी शाळेमध्ये सुद्धा गावरान उत्साहात, शारदेची प्रतिष्ठापना करण्यात आली. वाडीवरील आबालवृद्ध महिला,पुरुषांनी आपल्या लाडक्या पाल्यांसोबत या उत्सवाचा आनंद लुटला. यावर्षी नुकत्याच निवृत्त झालेल्या विद्यार्थीप्रिय मुख्या, माधवी जोशी यांचा सत्कार करताना गावकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सुद्धा आपली आठवण म्हणून स्टँड फॅन भेट दिला. मुलांनी आपल्या विविध रंगी कलागुणांचे सादरीकरण केले. पालकांनी उत्स्फूर्त दाद दिली.यावेळी मुख्या.संगीता माणगावकर अध्यक्ष अमिता नराम,सविता नराम चिन्मयी देवलकर, उदय नवले, सौ. नवले , मांडवकर आज्जी आणि पालक , ग्रामस्थ उपस्थित होते.
दिवसभर सुरू असलेल्या फोंडाघाट पंचक्रोशीतील शाळांमध्ये सरस्वती मातेचा उत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात सुरू होता.आणि शालेय शिक्षक, पालक संघ ,मान्यवर परिसरातील अबाल वृद्ध पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.














