मालवण | प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मालवण शहरातील बांगीवाडा येथील नवदुर्गा युवा मंडळाला आमदार निलेश राणे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मंडळाच्या आयोजनातून विराजमान असलेल्या देवीचे मनोभावे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात आमदार राणे यांच्या भेटीमुळे मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शहरप्रमुख राजू बिडये, तालुकाप्रमुख विनायक बाईत, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, नगरसेवक महेश कांदळगांवकर, सुशील शेडगे, मयू पारकर यांची उपस्थिती होती. नवदुर्गा युवा मंडळ बांगीवाडाचे अध्यक्ष मिथुन शिगले, अण्णा राजापूरकर, राहुल हराजकर, मुन्ना हाराजकर, सुमित हसोळकर, राजू कासले, गौरव कांबळे, मेघनाथ कांबळे, संकेत हसोळकर, सुधा कासले, भरत जाधव, सागर वाघेला, जितु पांचाळ, सुमेध जाधव यासह मंडळातील सदस्य, कुटुंबीय व महिला सदस्य या सर्वांच्या सहकार्यातून उत्सव यशस्वी ठरतो.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध मंडळांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होते. भाविकांकडून देवीच्या दर्शनासाठी गर्दी होत असून उत्सवातून धार्मिक परंपरा जपण्यासोबतच सामाजिक एकोपा आणि भक्तिभाव वृद्धिंगत होत आहे.













