दीर्घ प्रतीक्षेनंतर बळीराजाला दिलासा तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान
दोडामार्ग:सुहास देसाई
गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर दोडामार्ग तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या या मुसळधार पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना थंडावा मिळाला असून, पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, काही भागांत वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे शेतातील पिके करपण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले होते. अखेर सोमवारी सायंकाळच्या सुमारास हवामानात अचानक बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असले, तरी काही भागांत सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने काही ठिकाणी विजेचे खांब व तारांचे नुकसान झाले असून वीज पुरवठा खंडित झाला होता तर अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर दोडामार्ग तालुक्यात पावसाचे जोरदार आगमन झाले
काही भागात पावसाअभावी सुकत असलेल्या पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी समाधानी झाला असला तरी पिक पाण्या आभावी वाया गेली आहे तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान झालं आहे मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी शेती पिकांची पडझड होऊन नुकसान झालं आहे.
विजांचा कडकडाट आणि वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झालं आहे सायंकाळी विजे अभावी मोठी गैरसोय झाली आहे.













