रत्नागिरी प्रतिनिधी :
रत्नागिरीतील लॉजवर असताना ब्रेन स्ट्रोक आलेल्या कोल्हापूर येथील प्रौढाचा सीपीआर रुग्णालयात उपचारापूर्वीच आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शनिवार 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.10 वा.सुमारास घडली.
राजू वसंत शेटे (47,रा.करवीर,कोल्हापूर) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. राजू शेटे हे काही दिवसांपूर्वी रत्नागिरीत काही कामानिमित्त आले होते. त्यावेळी ते रत्नागिरीतील निलराज लॉजवर मुक्कामाला असताना त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. ही बाबत लॉजवरील कामगारांच्या निदर्शनास येताच त्यांना प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करुन अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.












