देवरूख (प्रतिनिधी):
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालय, देवरुख मधील राष्ट्रीय सेवा योजना व महिला विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रीनिमित्त ‘पानाफुलांची रांगोळी स्पर्धा’ व ‘मेहंदी रेखाटन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणे, सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे तसेच स्त्रीशक्ती, स्त्री सक्षमीकरण आणि निसर्ग संवर्धन यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा या स्पर्धांच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश होता.
पानाफुलांसह माती, शंख शिंपले, धान्य, दगड व पूजेचे साहित्य इत्यादी घटकांचा वापर करून साकारलेल्या नैसर्गिक व पर्यावरणपूरक रांगोळी रेखाटन स्पर्धेचा विषय ‘आदिशक्ती’/’स्त्रीशक्ती’ हा होता. या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धक पुढीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक: यश लाखन व दिपाली गोरुले. द्वितीय क्रमांक(विभागून): सेजल बोरे, तसेच सिद्धी झोरे व रिया गोमाणे.
तृतीय क्रमांक: सायली गुरव, आर्या सुटाके व तन्वी धावडे.
उत्तेजनार्थ श्रेया पवार व आकांक्षा गुरव.
मेहंदी रेखाटन स्पर्धेचा विषय ‘स्त्री सक्षमीकरण’ व ‘निसर्ग संवर्धन’ असा होता. या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धक पुढील प्रमाणे:
प्रथम क्रमांक: कस्तुरी गीते.
द्वितीय क्रमांक (विभागून): सुचिता दळवी व रिया गोमाणे.
तृतीय क्रमांक: श्रेया पवार.
उत्तेजनार्थ: आकांक्षा मोहिते व सिद्धी झोरे.
दोन्ही स्पर्धांचे परीक्षण प्रा. धनंजय दळवी व प्रा. देवयानी जोशी यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतींतून स्त्रीशक्तीचे महत्त्व, महिलांचे सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे मांडला.
दोन्ही स्पर्धांच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा कोरे, लेफ्टनंट प्रा. सानिका भालेकर, प्रा. सीमा शेट्ये, प्रा. स्वप्नाली झेपले व प्रा. देवयानी जोशी यांनी विशेष मेहनत घेतली. दोन्ही स्पर्धांच्या उत्तम आयोजनासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, कनिष्ठ महाविद्यालय समिती अध्यक्षा सुजाता प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी आयोजकांचे व सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांचे कौतुक केले.













