राष्ट्रीय ई-वक्तृत्व स्पर्धेत शुभम खरात याला प्रथम क्रमांक

S.S.P.M. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कणकवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा!

कणकवली : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या (S.S.P.M.) कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कणकवली येथील T.E. CSE (AIML) शाखेचा विद्यार्थी शुभम खरात याने राष्ट्रीय ई-वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवत्तेचा गौरव झाला आहे.या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर सर यांनी शुभमचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. नीलमताई राणे, उपाध्यक्ष आ.निलेश राणे, सचिव ना. नितेश राणे तसेच संस्थापक खा.नारायण राणे यांनी शुभमचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सांस्कृतिक, साहित्यिक आणि कलात्मक क्षेत्रातील या बहुआयामी यशामुळे एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कणकवलीच्या गुणवत्तापूर्ण सांस्कृतिक वाटचालीला नवी ओळख मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याची संस्थेची परंपरा या यशातून पुन्हा अधोरेखित झाली आहे.