मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची यशस्वी मोहोर

कव्वाली इव्हेंटमध्ये कांस्यपदकाची कमाई

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने आपल्या सांस्कृतिक यशाची परंपरा कायम राखत कव्वाली इव्हेंटमध्ये कांस्यपदक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. विविध सांस्कृतिक स्पर्धांनी रंगलेल्या या महोत्सवात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी दर्शन घडवत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

कव्वाली इव्हेंटमध्ये विद्यार्थ्यांनी संगीत, गायन, अभिनय आणि सांघिक समन्वय यांचा सुरेख मेळ साधत दमदार सादरीकरण केले. पारंपरिक कव्वालीच्या शैलीला सर्जनशीलतेची जोड देत सादर केलेल्या या कलाविष्काराला कांस्यपदकाने गौरविण्यात आले. हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, कलात्मकतेचे आणि सांघिक प्रयत्नांचे फलित ठरले.
कव्वाली टीम अक्षय शेलटे ,आर्या सप्रे ,श्रेया सावंत,तन्वी कळंबटे,दिव्यांगिनी पोतदार,कनिष्क जाधव,संतोषी दमाई ,सार्थक चव्हाण,वेदांगी चक्रदेव
कव्वाली इव्हेंटचे दिग्दर्शन गौरव बंडबे यांनी केले. त्यांच्या कल्पक दिग्दर्शनातून सादरीकरणाला प्रभावी स्वरूप प्राप्त झाले. संघ व्यवस्थापक प्रा.तन्वी कांबळे आणि डॉ.आनंद आंबेकर संपूर्ण टीम सोबत मुंबई येथे प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते.तसेच या इव्हेंटसाठी तसेच कश्मिरा सावंत यांचे बी पी ए विद्यार्थांना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना योग्य दिशा देत प्रभावी सादरीकरण करता आले.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालय दरवर्षी मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी करत असते. यंदा कव्वाली इव्हेंटमध्ये मिळालेले कांस्यपदक महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरले आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणारे आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारे महाविद्यालयाचे सांस्कृतिक उपक्रम या यशातून अधोरेखित झाले आहेत.

सदर यशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर प्राचार्य डॉ
मकरंद साखळकर प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई ,कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये ,वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ.सीमा कदम ,विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ.अपर्णा कुलकर्णी , सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर यांनी अभिनंदन केले आहे.