महाप्रसादासाठी पत्रावळी ऐवजी केळीच्या पानाचा वापर, पर्यावरणाचा संदेश

आरगाव ग्रामदैवत श्री केदारलिंग मंदिरात दसरा उत्सव उत्साह संपन्न

संतोष कोत्रे
लांजा: प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या पत्रावळींचा होणारा कचरा लक्षात घेऊन आणि देवस्थान अध्यक्ष अध्यक्ष शैलेश खामकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आरगाव ग्रामस्थांनी ग्रामदैवत श्री केदारलिंग मंदिरात महाप्रसादासाठी पत्रावळी ऐवजी केळीच्या पानाचा वापर करत पर्यावरण पूरक संदेश दिला.
केळीच्या पानावर जेवण करणे ही भारतीय परंपरा आहे. यात नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलिमर्स असतात, ज्यामुळे गरम अन्न वाढल्यावर पानातील पोषक घटक अन्नात मिसळतात. हे पर्यावरणपूरक, स्वच्छ, आणि पचनासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. गरम अन्न पानावर ठेवल्यास पानाचा मंद सुवास अन्नात उतरतो, ज्यामुळे जेवणाची चव वाढते.
परंतु गेल्या काही वर्षात प्लास्टिक आणि थर्माकोल पत्रावळी यांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. घरगुती व सार्वजनिक समारंभामध्ये अशा पत्रावळींचा वापर केला जातो. मात्र पर्यावरण दृष्ट्या ते अयोग्य ठरते. प्लास्टिक पत्रावळींचा विघटन होत नाही. परंतु केळीच्या पानाचा नैसर्गिकरित्या विघटन होते .
हीच बाब लक्षात घेऊन आरगाव येथील ग्रामदैवत श्री केदारलिंग मंदिर चे अध्यक्ष शैलेश खामकर यांनी दसरा उत्सवामध्ये महाप्रसादासाठी संपूर्ण गावाला प्लास्टिक पत्रावळी ऐवजी केळीच्या पानाचा वापर करावा असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण गावाने
आरगाव केदारलिंग मंदिरात साजरा झालेल्या दसरा उत्सवामध्ये नऊ दिवस महाप्रसादासाठी पत्रावळी ऐवजी केळीच्या पानाचा वापर करीत पर्यावरण पूरक संदेश दिला.
श्री केदारलिंग मंदिरामध्ये नऊ दिवस हरिपाठ, किर्तन, संगीत भजन, वारकरी भजन, टिपरी, गरबा नृत्य, दिंडी सोहळा अशा विविध कार्यक्रम
सर्व धार्मिक रूढी परंपरा संभाळून भक्तिमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. यासाठी देवस्थानचे अध्यक्ष शैलेश खामकर, खजिनदार शशिकांत खामकर, सेक्रेटरी उत्तम आमटे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी मेहनत घेतली.
दरम्यान महाप्रसादासाठी पर्यावरण पूरक केळीच्या पानाचा वापर करत आरगाव ग्रामस्थांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे.