खो-खो अन् ॲथलेटिक्समध्ये मारली बाजी
कलंबिस्त । रविंद्र तावडे : कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सावंतवाडी तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवत शाळा व गावाच्या लौकिकात भर घातली आहे. बांदा येथे पार पडलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये खो-खो आणि ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत १४ वर्षांखालील मुली व १७ वर्षांखालील मुली या दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली होती. त्यानंतर पार पडलेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने अत्यंत अटीतटीच्या सामन्यात अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत उपविजेतेपद (द्वितीय क्रमांक) पटकावले. या उपविजेत्या संघात हर्षदा मेस्त्री, विशाखा कदम, गायत्री राऊळ, रसिका राऊळ, सावली राऊळ, खुशी राऊळ, सार्था बिडये, तनिषा देसाई, खुशी धुरी, स्नेहा वर्दम, श्रध्दा नेवगी, मनस्वी राऊळ, सान्वी गावडे आणि किर्ती राऊळ या खेळाडूंचा समावेश होता.
तालुकास्तरीय ॲथलेटिक्स व मैदानी स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी पदकांची लयलूट केली. १४ वर्षांखालील गटात थाळीफेक स्पर्धेत कु. वैदेही संदेश बिडये, ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कु. हर्षदा दिपक मेस्त्री आणि उंच उडीत कु. रसिका आनंद राऊळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कु. खुशी शिवराम धुरी हिने द्वितीय क्रमांक मिळवला, तर ४×१०० मीटर रिले स्पर्धेत कु. विशाखा गोविंद कदम, कु. गायत्री संदिप राऊळ, कु. खुशी संजय राऊळ, कु. हर्षदा दिपक मेस्त्री आणि कु. खुशी शिवराम धुरी या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
तसेच १७ वर्षांखालील गटात ४०० मीटर धावण्यात कु. दिव्या जयद्रथ राऊळ व उंच उडीत कु. प्रिती शरद मेस्त्री यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. ८० मीटर हर्डल्स स्पर्धेत कु. विजया विश्वनाथ मेस्त्री हिने तृतीय क्रमांक मिळवला, तर ४×१०० मीटर रिले स्पर्धेत कु. दिव्या जयद्रथ राऊळ, कु. दिव्या शा. राऊळ, कु. विजया मेस्त्री, कु. समृद्धी गावडे आणि कु. प्रिती मेस्त्री या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
या सर्व यशस्वी खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. प्रकाश पावरा यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले असून मुख्याध्यापक श्री. अभिजित जाधव यांचे खंबीर प्रोत्साहन लाभले. या दैदीप्यमान यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री. शिवाजी सावंत, सचिव श्री. यशवंत राऊळ, सहसचिव श्री. चंद्रकांत राणे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. अभिजित जाधव, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, क्रीडाप्रेमी व पालकांकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून पुढील स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.












