आंबव पोंक्षेतील प्रकाश पोंक्षे यांनी स्वखर्चाने बांधले बंधारे

सेवानिवृत्ती नन्तर देखील सामाजिक कार्याचा आदर्श

गौरव पोंक्षे माखजन
सध्या दुष्काळी परिस्थिती चा सामना करण्यासाठी गावागावात बंधारे बांधले जात आहेत.बहुतांश ठिकाणी हे कार्य ग्रामपंचतीनी हातात घेतलेले दिसत आहे.तर काही ठिकाणी.बचत गट,महिला मंडळ,सेवाभावी संस्था पुढाकार घेताना दिसत आहे.संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावातील शिक्षकी पेशातून निवृत्त झालेल्या श्री प्रकाश गजाजन पोंक्षे यांनी स्वखर्चाने गांवात दोन बंधारे बांधत,एक सामाजिक बांधिलकीचा वेगळा आदर्श घालून दिला आहे.स्वतः हातात पावडे घेऊन मंजूरांसोबत बंधारा बांधत पाणी अडवा,पाणी जिरवा चा संदेश त्यांनी दिला आहे.त्यांनी स्वयंप्रेरणेने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करताना प्रकाश पोंक्षे यांनी ज्या शाळांमध्ये काम केल.त्या त्या शाळांच नंदनवन झालेल पाहायला मिळालं.त्याच्या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाला म्हणून नव्हे, तर आदर्श शाळा कशी असते?ही संकल्पना स्पष्ट करून घेण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील मंडळीची,त्यांची शाळा पाहण्यासाठी रिघ लागत असे.आदर्श शिक्षक म्हणून नाव लौकिक मिळवलेल्या श्री प्रकाश पोंक्षे यांनी सेवानिवृत्ती नंतर सामाजिक बांधिलकी जपत आहेत.आदर्श कामाची सवय लागलेल्या प्रकाश पोंक्षे यांनी, याचं भावनेतून दुष्काळाची चाहूल लक्षात घेत श्री प्रकाश पोंक्षे यांनी गावातून वाहून जाणारे पाणी अडवत स्वखर्चाने बंधारे घातले आहेत.या बंधाऱ्यांमुळे भूजलं पातळी टिकून राहण्यास मदत होणार आहे.
हा आदर्श जिल्ह्यातील विविध गावात घेतला.तर मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी अडवण्यात यश येऊ शकते .ग्रामपंचायत करेल,शासन खर्च करेल याची वाट पाहत बसलो तर वाहून जाणारे पाणी थांबणार नाही.प्रकाश पोंक्षे यांनी स्वतःहून पुढे येत बांधलेल्या बंधाऱ्यांचा आदर्श घेऊन कामकाज केल्यास,भविष्यातील पाणी टंचाई चे सावट दूर होण्यास मदत होईल हे मात्र खर