दापोली :
दापोलीतील हर्णे बाजारपेठेत दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.२५ वाजताच्या सुमारास फसवणुकीची एक गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणात संशयित आरोपी मयूरेश आंबुर्ले (वय ३४ वर्षे, रा. हर्णे बाजारपेठ, दापोली) याने अनिल नारायण रघुवीर, जगदीश काशीनाथ पावसे आणि रनिकेत वामन रघुवीर (सर्व रा. हर्णे, ता. दापोली, जि. रत्नागिरी) या व्यक्तींनी ‘आयटस स्पोर्ट्स अँड सेफ्टी प्रा. लिमिटेड’ कंपनीकडून पॉवर बोट हँडलिंग आणि लाईफ सेव्हिंग तंत्रज्ञानाचे कोणतेही अधिकृत प्रशिक्षण घेतलेले नसतानाही, त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला. आरोपी मयूरेश आंबुर्ले याने या व्यक्तींना बोट चालवण्याचे परवाने मिळवून देण्यासाठी कंपनीचे पॉवर बोट हँडलिंग व लाईफ सेव्हिंग तंत्रज्ञानाचे बनावट प्रमाणपत्र तयार केले. या बनावट प्रमाणपत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि पर्यायाने महाराष्ट्र शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १८.४३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












