रत्नागिरी :
रत्नागिरी शहरातील टिळकनगर, पटवर्धनवाडी येथील आकांक्षा सोसायटीत १ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास फसवणुकीची एक गंभीर घटना घडली आहे. एका अज्ञात भामट्याने फिर्यादी राजेंद्र दूंडाप्पा गडवी (वय ६६) यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपण महानगर गॅस एजन्सीमधून बोलत असून तुमचा गॅस पुरवठा बंद होणार असल्याचे सांगितले. गॅस सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी मदत करतो, असे सांगून त्याने वृद्धाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर एक ॲप्लिकेशन फाईल पाठवून ती ओपन करण्यास भाग पाडले आणि त्यामध्ये डेबिट कार्डची माहिती भरण्यास लावून तब्बल २ लाख ७३ हजार रुपयांचा गंडा घातला. अज्ञात इस्माचा विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येते 23 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे












