भिकाजी गवळी यांचे निधन

मसुरे | प्रतिनिधी :मालवण तालुक्यातील श्रावण गवळीवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिकाजी तुकाराम गवळी ( 88 वर्ष) यांचे नुकतेच मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

भिकाजी गवळी यांचे श्रावण तसेच मसुरे गावामध्ये सामाजिक, धार्मिक क्षेत्रात योगदान होते. परोपकारी वृत्तीमुळे त्यांचे जनमानसात आदराचे स्थान होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र गवळी यांचे ते वडील होत.