राजापूर प्रतिनिधी : तालुक्यातील येळवण गावचे सुपुत्र असलेले प्रसिध्द लेखक, दिग्दर्शक व अभिनेता राजेश देशपांडे हे आता स्टार प्लस वरील गाजत असलेल्या अनुपमा या हिंदी मालिकेत मोहनलाल मठेला या खलनायकी भूमिकेत दिसणार आहेत. आपल्या दमदार अभिनयाने देशपांडे यांनी या मालिकेत साकारलेली मोहनलाल मठेला या खलनायकाची भूमिका लक्षवेधी ठरत आहे.
राजापूर तालुक्यातील येळवण गावचे सुपुत्र असलेले प्रसिध्द लेखक, दिग्दर्शक व अभिनेता राजेश देशपांडे हे सिनेसृष्टीतील एक गाजलेले नाव आहे. मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका क्षेत्रात गेली अनेक वर्षे ते कार्यरत आहेत. तर अनेक सुप्रसिद्ध नाटकं, मालिका, चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. यामध्ये त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत.तर त्यांनी लिहिलेली व दिग्दर्शीत केलेली अनेक नाटके मराठी रंगभूमीवर गाजलेली आहेत. त्यामुळे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून त्यांचा या क्षेत्रात दबदबा आहे.
आता त्यांचा नवा लुक आणि अभिनय प्रेक्षकांना पहायवास मिळत आहेत. स्टार प्लस वरील सध्या गाजत असलेल्या अनुपमा या हिंदी मालिकेत ते मोहनलाल मठेला या खलनायकाची भूमिका साकारत आहेत. डायरेक्टर्स कट या राजन शाही यांच्या प्रोडक्शन हाऊसची ही मालिका आहे. ये रिश्ता क्या केहलाता है सारखी गेली चौदा वर्ष चाललेली आणि आई कुठे काय करते सारखी रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या मालिकां सारख्या अनेक मालिकांची निर्मिती केलेल्या या संस्थेच्या आणि स्टार प्लस सारख्या हिंदी वाहिनी वर दणकट भूमिका ही लेखिका नमिता वर्तक मुळे मिळाली असं राजेश देशपांडे यांनी सांगितले. अनुपमाची मुख्य भूमिका करणाऱ्या रुपाली गांगुली यांच्याशी आपलं छान टूनिंग झाल्या मुळे ही भूमिका साकारताना खूप आनंद मिळत असल्याचंही त्यांनी सांगितले. आपल्या दमदार आणि कसदार अभिनयाने राजेश देशपांडे यांची ही खलनायकाची भूमिका सध्या चांगलीच चर्चेत आहे.
Home महत्वाच्या बातम्या राजापुरचे सुपुत्र अभिनेते राजेश देशपांडे स्टार प्लस वरील अनुपमा या हिंदी मालिकेत...













