आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेमध्ये संगमेश्वरच्या तायक्वांदोपट्टूची निवड

देवरूख (प्रतिनिधी):

मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धा आर. पी. गोगटे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स अँड आर. व्ही. जोगळेकर कॉलेज कॉमर्स रत्नागिरी यांच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धा २०२६-२७ आर. पी. गोगटे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स अँड आर. व्ही. जोगळेकर कॉलेज कॉमर्स रत्नागिरी या ठिकाणी दिनांक २५ व २६ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमीच्या तायक्वांदोपट्टूंची निवड आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेसाठी मयुरी राऊत – न्या. तात्यासाहेब आठल्ये कला, वेद. एस. आर. सप्रे वाणिज्य व वि. दादासाहेब पित्रे विज्ञान महाविद्यालय, (स्वायत्त) देवरुख या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहे ओम घाग – सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहे त्यांना शुभेच्छा देण्याचा छोटेखानी सत्कार समारंभ नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब देवरुख या ठिकाणी क्लब अध्यक्षा तालुका उपाध्यक्षा सौ.स्मिता लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, क्लब उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, क्लब सदस्या रूपाली कदम, पालक प्रतिनिधी अदिती लोध, प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे, सुमित पवार,आदी उपस्थित होते.

या निवड झालेल्या खेळाडूंना तालुका अँकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाषजी बने, तालुक्याचे आमदार शेखर निकम,माजी राज्यमंत्री रविंद्र माने, जिल्हापरिषद माजी अध्यक्ष रोहन बने,देवरुख शहराच्या नगराध्यक्ष मृणाल शेट्ये,जिल्हा संघटना अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये,तालुक्याचे खजिनदार चिन्मय साने, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्त्ये,क्लब उपाध्यक्षा ॲड. सौ पुनम चव्हाण,अँकॅडमीचे उपाध्यक्ष परेश खातू, लायन्स तायक्वांदो क्लब अध्यक्ष दिलीप रहाटे,क्लब सदस्या स्वाती नारकर,सिनियर खेळाडू सौरभ वनकर, निखिल लाड, सानिका प्रसादे,संकेत मापुस्कर,पंकज मेस्त्री, सुशांत मेस्त्री,सिद्धी केदारी,वेदांत गिड्ये,गायत्री शिंदे,आदींनी अभिनंदन केले.