जी. जी. पी. एस. शाळेत माता-पालक मेळावा

रत्नागिरी,  : जी. जी. पी. एस. शाळेमध्ये माता-पालक मेळावा नुकताच झाला. यात मानसशास्त्रज्ञ स्वामिनी चव्हाण यांनी मुलांच्या मूल्यशिक्षणाविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. १०० पालकांनी या मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
स्वामिनी चव्हाण यांनी मुलांमध्ये मूल्यशिक्षण रुजवण्यात पालकांची भूमिका, मुलांशी सुसंवाद साधण्याचे महत्त्व आणि मुलांच्या मानसिक विकासासाठी घरातील सकारात्मक वातावरण याविषयी मार्गदर्शन केले. पालकांनीही शंका विचारून चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. मेळाव्याचे आयोजन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा मूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अशा उपक्रमांतून शाळा व पालक यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होईल, असा विश्वास सौ. मूरकर व्यक्त केला. सूत्रसंचालन सौ. सई सरदेसाई यांनी केले. या कार्यक्रमानंतर माता पालकांनी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसोबत गरबा नृत्यामध्ये सहभाग घेतला.