म्हापण : प्रतिनिधी
पाट हायस्कूल मध्ये कै.मा. एकनाथजी ठाकूर कला अकादमी मार्फत विविध कला विषयक उपक्रम मुलांसाठी घेतले जातात . कलादालानातील विविध उपक्रमामध्ये मुलांचा चांगला सहभाग असतो .या मुलांना कले बरोबर इयत्ता दहावी मधील वाढीव गुणांचा लाभ होतो .नृत्यकल्यामुळे शरीराचा लवचिकपणा ,मानसिक स्वास्थ्य आणि मोबाईल पासून दूर राहण्याकरिताच जागरूक पालक नृत्य कला वर्गामध्ये मुलांना सहभागी करतात .
पाट हायस्कूल मधील नृत्य वर्गामधील सहभागी मुलांचा गावातील विविध उपक्रमात सहभाग असतो त्यामुळे या मुलांचे विशेष कौतुक संस्था चालकांच्या मार्फत केले जाते . आणि कलाकार म्हणून एक ओळख निर्माण करतात . कलादानातील घुंगरू वितरणाच्या कार्यक्रमात अन्वी परब, स्पृहा नाईक, चार्वी निवतकर, स्नेहल मेस्त्री, भक्ती तेली कोचरेकर या विद्यार्थिनींचा सहभाग होता . तर यांना मार्गदर्शन करणारे स्नेहंकता सुधीर हडकर . भार्गवी सुनील राणे . त्याचप्रमाणे कलाशिक्षक संदीप साळसकर उपस्थित होते . मुख्याध्यापक सयाजी बोंदर ,पर्यवेक्षिका अंकिता मोडक त्याचप्रमाणे सर्व संस्था संचालकांच्या मार्फत कलादानातील या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले .तसेच प्रत्येक मुलांनी कोणतीतरी कला जोपासावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले .













