चिऱ्यावरील पाच टक्के जी.एस.टी आणि मागील पाच वर्षांच्या कर आकारणीचीही चर्चा; अधिकार
मंडणगड प्रतिनिधी : गौण खनिज उत्खन्नना संदर्भात जाचक अटी दुष्काळाचे पार्श्वभुमीवर पाण्याची अनुउपलब्धता यामुळे तालुक्याचा यंदाचा बांधकाम हंगाम सुरु होण्यापुर्वी विविध समस्यांना सामोरा जात आहे. बांधकामसाठी आवश्यक असणारी वाळु चिरा यांची सहज उपलब्धतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत नागरीकांना जास्तीचे दराने आवश्यक गोष्टीची उपलब्धता करावी लागणार असल्याने शासकीय अनुदानाती बांधली जाणारे घरे पुर्ण न होण्याची भिती आहे. गेल्या काही वर्षात तालुक्यात अधिकृत रेती उपशाकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली निविदा प्रक्रीया पुर्ण झालेली नाही त्यामुळे यंदाही वाळु काळ्या बाजाराचे दराने खरेदी करावी लागणार आहे. तालुक्यात चिरेखाणींचा हंगाम सुरू होत असतानाच स्वामित्वधन (रॉयल्टी) भरण्याची आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याची बाब चर्चेत आली. या संदर्भात स्थानीक महसलु विभागाचे सर्व अधिकार प्रांता कार्यालयाकडे दापोली येथे सोपवण्यात आले आहेत त्यातही यंदा चिऱ्यावर पाच टक्के इतका जि.एस.टी. कर लादण्यात आला आहे व स्थानिक व्यवसाईकांकडून गेल्या पाच वर्षाचा कर वसुलीचे आदेश संबंधीतांना देण्यात आले आहेत. स्वामित्वधनाची प्रक्रिया पूर्ण पुर्वीपेक्षा अधिक क्लिष्ठ झाली आहे. त्यामुळे ही प्रक्रीया पुर्ण न करताच तालुक्यात काही चिरेखाणी सुरू झालेल्या असल्याची चर्चाही आहे. अशा खाणींच्या विरोधात महसूल विभाग आणि प्रांताधिकारी कार्यालय कोणती भूमिका घेणार या बद्दल पुरेशी स्पष्टता नाही, चिरेखाण व्यवसायात उत्खननाचा खर्च, मजुरी, वाहतूक, कर आणि स्वामित्वधन यांचा एकत्रित परिणाम विक्रीदरावर होत असल्याने नव्या हंगामाच्या सुरुवातीला प्रशासकीय प्रक्रिया आणि कर आकारणीबाबत अनिश्चितता राहिल्यास व्यावसायिकांच्या आर्थिक गणितावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात चिऱ्यांचे दर वाढून ग्राहकांना चिरे महाग मिळण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. वाळु उपलब्ध होत नसल्याने स्थानीक पातळीवर काळ्या दगडाची पावडर गिरीट व चिऱ्याची धाव यांचा स्थानीक पातळीवर जोडकोमासाठी वापर होत असला तरी बांधकामासाठी लागणार पाणी व कच्चा माल यांची उपलब्धता नसल्याने बांधकाम हंगामाने वेग पकडलेले नाही व त्याचा परिणाम तालुक्याचे आर्थकारणावरही होताना दिसून येत आहे बांधकाम क्षेत्रातील मंदिचे परिणाम बाजारपेठेवर झिरपताना दिसत आहेत.













