चिपळूण (प्रतिनिधी) : स्वाभिमानी सेवानिवृत शिक्षक व अधिकारी संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारणीच्या सभेचे आयोजन रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी चिपळूणच्या सभागृहात शनिवार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वा. करण्यात आले आहे. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेस जिल्ह्यातील संघटनेचे राज्य पदाधिकारी, सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सभेमध्ये प्रामुख्याने संघटनात्मक कार्याचा आढावा, स्वाभिमानी सेवानिवृत्त शिक्षक व अधि.संघटना जमा – खर्च, तालुका निहाय सभासद आढावा, गटविमा प्रस्ताव, प्रा.फंड, वेतन निश्चिती फरक रक्कम किंवा अन्य प्रलंबीत रक्कम याबाबत चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व अधिकाऱ्यांनी आपल्या प्रलंबीत प्रश्नांबाबत तालुकाध्यक्ष यांचेशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन स्वाभिमानी सेवानिवृत शिक्षक व अधिकारी संघटना, जिल्हा सरचिटणीस प्रदीप पवार यांनी केले आहे.













