रत्नागिरीत अवकाळी पावसाचा तडाखा; कापणीस तयार भात पिकाचे नुकसान

रत्नागिरी: रत्नागिरी आणि परिसराला रविवारी रात्री झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. गेले काही दिवस वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळे आधीच हैराण झालेल्या नागरिकांना या अनपेक्षित पावसाचा मोठा फटका बसला आहे.
रात्री आठच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या मुसळधार सरी आणि विजांच्या कडकडाटाने संपूर्ण वातावरण ढवळून निघाले. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले, तर ढगांच्या सततच्या गडगडाटाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते या पावसाचा फटका शेतीला मोठ्या प्रमाणावर बसला असून, महान जातीचे भात पीक अद्यापही शेतात उभे असल्याने ते नष्ट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.