बांदा : गाळेल गावचे रहिवाशी भिकाजी कृष्णा सावंत मुंबई येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, यांना ”समर्थ आरोग्य फाउंडेशन, न्यूट्रिफील हेल्थ प्रॉडक्ट” आणि ”शिवशंभो निवासी व्यसनमुक्ती केंद्र” कोल्हापूर, या सामाजिक संस्थांच्या वतीने सन २०२५-२६ चा ‘’आरोग्यरत्न पुरस्कार’’ २८ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथील ”हॉटेल सयाजी” येथे आयोजित विशेष सोहळ्यात संस्थेच्या विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
व्यसनमुक्ती, मधुमेहमुक्ती, रोगमुक्ती, शिशुरक्षा आणि वेदनामुक्ती अशा महत्त्वपूर्ण विषयांवर सदर संस्था कार्यरत आहेत. हे अभियान घरोघरी पोहोचवण्यासाठी संस्थांकडे प्रशिक्षित हजारो पीआरओ, डॉक्टर, सोशल वर्कर, शिक्षक, विद्यार्थी आणि गृहिणी कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून लाखो लोकांना या अभियानाचा लाभ झाला आहे.
या अभियानांतर्गत भिकाजी कृष्णा सावंत यांनी हजारो लोकांशी संपर्क साधून त्याना व्यसनमुक्त आणि मधुमेहमुक्त करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही या अभियानाचा प्रसार आणि प्रचार करण्यात आला आहे.
या कार्यामुळे अनेक कुटुंबांना नवसंजीवनी मिळत आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट कार्य करणाऱ्या हजारो पीआरओ मधून श्री. भिकाजी कृष्णा सावंत यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
भिकाजी सावंत यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे समाजाच्या विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













