श्रवण गांवकर या युवकाचा प्रामाणिक पणा. २० ग्राम सोन्याचे चैन केली मालकाकडे सुपूर्द

ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे देऊळवाडी येथिल युवक श्रवण श्रीकांत गावकर या युवकाच्या प्रामाणिक पणाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. वॉशिंग मशीन रिपेअर करताना त्यात मिळालेली अनिकेत कुडाळकर याची २० ग्राम सोन्याची म्हणजे तब्बल अडीच लाखाहून अधिक किमतीची हरवलेली चैन त्यांनी अनिकेत कुडाळकर यांचे वडील रवींद्र कुडाळकर यांच्याकडे सुपूर्द करत प्रामाणिक पणाचे दर्शन घडविले .

डॉ.अनिकेत कुडाळकर यांची तब्बल २० ग्राम सोन्याची चैन ६ महिन्यापूर्वी हरवली होती. त्यांनी सर्वत्र शोधा शोध शोध केली मात्र ती न मिळाल्याने त्यांनी ती कुठे तरी मिळेल ही आशा सोडली होती.आज सकाळी कुडाळकर यांनी आपल्या घरातील बिघडलेले वॉशिंग मशीन रिपेअर करण्यासाठी गावातीलच वॉशिंग मशीन फ्रीज रिपेअर करणारे श्रवण गावकर याला बोलविले त्यांनी मशीन खोलल्यानंतर मशीन चे पार्ट अलग केली त्यावेळी त्याला आत एका पार्ट मध्ये काहीतरी अडकल्याचे दिसले. त्यानी बाहेर काढताच सोन्याची चैन असल्याचे समजले यावेळी त्यांनी लगेचच रवींद्र कुडाळकर यांना बोलवून त्यांच्याकडे ती सुपूर्द केली.सहा महिन्यापूर्वी आपल्या मुलाची हरवलेली सोन्याची चैन मिळेल ही आशा सोडलेल्या रवींद्र कुडाळकर यांना हरवलेली चैन मिळताच आंनद झाला पण याहीपेक्षा या गोष्टीचा आनंद झाला कि आजही श्रवण गावकर सारखे प्रामाणिक युवक समाजात आहेत ज्यांची परिस्थिती खूप श्रीमंत नाही पण संस्कार आणि विचार श्रीमंत आहेत . मनात वाटल असत तर त्यांनी ही चैन दाखविली ही नसती मात्र आपणाला स्वतःहून बोलवून ती त्यांनी आपल्याकडे सुपूर्द केली याबद्दल त्यांनी श्रवण याच्या प्रामाणिक पणाचे कौतुक केले.श्रवण गावकर याच्या प्रामाणिक पणा बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.