मसुरे | झुंजार पेडणेकर :अंदमानच्या ऐतिहासिक सेल्युलर जेलमधील आठवणी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्यागाची गाथा आता मुंबईकरांना, विशेषतः विलेपार्लेकरांना अनुभवता येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर विचार प्रचार विभागातर्फे विलेपार्ले (पूर्व) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्रात १ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत “वीर सावरकर जागर” या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
१ नोव्हेंबर रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. याच दिवशी आयोजित किल्ला कार्यशाळेत लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या हातांनी किल्ले साकारले. या यशस्वी सुरुवातीनंतर २ ते २२ नोव्हेंबर दरम्यान हे प्रदर्शन सर्वांच्या भेटीसाठी उपलब्ध आहे.
क्रांतिकारकांना एकांतवासात ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेल्या तुरुंगाचा हुबेहूब देखावा.१९११ मध्ये दोन जन्मठेपेची (पन्नास वर्षांची) शिक्षा भोगताना सावरकरांनी ज्या अरुंद, अंधाऱ्या कोठडीत दिवस काढले, तिचे लघुप्रारूप.
पोर्ट ब्लेअर येथील सावरकरांच्या विमानतळावरील पुतळ्याचा कटआउट.
स्वातंत्र्यलढ्याच्या अखंड तेजाचे प्रतीक असलेली मशाल.
१९११ मधील त्या ऐतिहासिक संघर्षाची जाणीव करून देणारी ही प्रतिकृती प्रत्येक पाहुण्याच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करत आहे. प्रदर्शनाच्या शेवटी नागरिक विमानतळावरील पुतळ्याच्या प्रतिकृतीसमोर फोटो काढून आणि क्रांतीज्योतीसमोर नतमस्तक होऊन या जागराचा भाग बनत आहेत.
▪️तरुण कलाकारांसाठी पोस्टर मेकिंग स्पर्धा-
जागराच्या समारोपाच्या दिवशी, म्हणजेच २२ नोव्हेंबर २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि जीवन यावर आधारित पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
गट १: १० ते १८ वर्षे
गट २: १९ वर्षे आणि त्यावरील
या स्पर्धेतील दोन्ही गटांतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिक आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आणि तरुण कलाकारांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजतफे करण्यात आले आहे.
माहिती व संपर्क:
स्थळ: स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र, एम. जी. रोड, विलेपार्ले (पूर्व)
वेळ: सायंकाळी ६ वाजल्यापासून
संपर्क: संजय सावंत – ९८२०९५९५७२
या प्रकल्पाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर विचार प्रचार विभागाचे अध्यक्ष श्री. अरविंद रमेश प्रभू, कार्याध्यक्ष श्री. सुभाष वि. पेठे, कार्यवाह श्री. केशव द. परांजपे, कोषाध्यक्ष श्री. विनायक कृ. जोशी तसेच उद्योजक श्री. दीपक परब आणि श्री. संजय सावंत हे विशेष परिश्रम घेत आहेत. मुंबईकर तरुणांनी आणि पार्लेकर नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन स्वातंत्र्यवीरांचा हा जागर पुढे नेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.













