मसुरे | झुंजार पेडणेकर
बॅ. नाथ पै सेवांगण, कट्टा आणि बॅ. नाथ पै वाचनमंदिर, कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. मधू दंडवते स्मृतिदिनानिमित्त व दीपावली निमित्ताने कट्टा दशक्रोशी मर्यादित ‘आकाशकंदील व भेटकार्ड स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा एकूण चार गटांत घेतली जाणार आहे: पहिला गट: १ ली ते ४ थी , दुसरा गट: ३ री ते ७ वी,
तिसरा गट: ८ वी ते १० वी
चौथा गट: खुला गट (यामध्ये शिक्षकांनीही सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे)
स्पर्धकांनी भेटकार्ड व आकाशकंदील घरी बनवून शुक्रवार दि. ६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत बॅ. नाथ पै सेवांगण, कट्टा येथे सकाळी ९ ते १२ व सायं. ४ ते ७ या वेळेत आणून देणे आवश्यक आहे.
गुरुवार दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता बक्षीस वितरण सोहळा पार पडेल.
या स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी ९९६०३८११८६ या क्रमांकावर संपर्क साधावा.













