▪️माजी विद्यार्थ्यांचे चाळीस हजार रुपयांचे योगदान
मसुरे | झुंजार पेडणेकर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळंब कातवड या प्रशालेतील छोट्या मुलांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठीची गरज ओळखून शाळेच्या हॉलमध्ये कायम स्वरुपी रंगमंच तयार करण्याचे आवाहन माजी मुख्याध्यापक श्री अंकुश वासुदेव कणेरकर यांनी गत वर्षी माजी विध्यार्थ्याना केले होते.त्याला प्रतिसाद साद देऊन आपल्या शाळेबद्दल आस्था बाळगून आत्मियतेने माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक स्वरूपात मदत गोळा केली तसेच दानशूर व्यक्ती यांच्याही आर्थिक सहाय्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळंब कातवड या प्रशालेच्या सभागृहात 40,000/- रुपये किमतीचा भव्य असा कायम स्वरुपी रंगमंच तयार करण्यात आला. सदर रंगमंचाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने दानशूर व्यक्तिमत्व सेवानिवृत्त सौ. कांता प्रकाश तोरसकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अतिशय भव्य असे स्टेज प्राप्त झाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला,उत्साहपूर्ण वातावरण सदर रंगमंचावर मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपला आनंद द्विगुणित करून उपस्थित सर्वांची मने जिंकली. माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून कायम स्वरुपी स्टेज तयार करून दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती कोळंब कातवड, मुख्याध्यापक श्री नारायण पराडकर,सहकारी शिक्षिका सौ. प्रितम पारकर तसेच विद्यार्थी,ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त करून माजी विद्यार्थ्यांच्या या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले.रंगमंच उद्घाटन कार्यक्रमाच्यावेळी पंचायत समिती सदस्या सौ योजना कांबळी, सरपंच सौ. सिया धुरी, ग्रा. प. सदस्य मंगेश चव्हाण, सदस्या सौ निकिता बागवे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अमित लोके,दानशूर व्यक्तिमत्व श्री. बापू परब,माजी विद्यार्थी प्रमुख सोनाली कदम, तन्वी बागवे,साक्षी बागवे,गोपाल बागवे,सागर धुरी,कामना कणेरकर,वैष्णवी चौगुले, दिशा कणेरकर,सहदेव कदम,सत्यवान लोके,सागर चव्हाण, आनंद धुरी,शैलेश चव्हाण, सुधीर लोके,ज्येष्ठनगरिक आणि मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.













