मसुरे | झुंजार पेडणेकर: दिवाळी सणाचे औचित्य साधून श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील ग्रामस्थांना उटण्याचे वाटप करण्यात आले.
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि मांगल्याचा सण मानला जातो. या सणाच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान व आरोग्य नांदावे, या सद्भावनेतून मंडळाने हा उपक्रम राबविला आहे.
यावेळी ग्रामस्थांचे उत्तम आरोग्य, कुटुंबातील सुख-समृद्धी आणि गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच गावातील सामाजिक सलोखा, एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ व्हावा, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
सण-उत्सवांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्याचे आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम मंडळाकडून सातत्याने केले जात आहे. मंडळाच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे गावातील सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकात्मता टिकून राहण्यास मदत होत आहे.
यावेळी जिजी सावंत, देऊ सावंत, अनिल परब, शिवराम पुजारे, दिवाकर पुजारे, रमेश मुणगेकर, मंडळाचे खजिनदार वैभव परब,अमित पुजारे,अक्षय परब, संतोष परब, सोमा लाड, वेदांत सावंत, अनुज गोलतकर, राजा पुजारे, मंथन मुणगेकर, विकी पुजारे, संतोष परब,मिहिर परब, अर्णव गोलतकर उपस्थित होते .













