नगरपंचायत, महावितरण कर्मचारी सर्पमित्र यांचा कॉलेज परिसर रहिवाशी संघ लांजा तर्फे सन्मान

दिवाळी सणाचे औचित्य साधून कार्यक्रमाच आयोजन

लांजा (प्रतिनिधी) : कॉलेज परिसर रहिवाशी संघ लांजा च्या वतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून लांजा नगरपंचायत कर्मचारी, महावितरण कर्मचारी आणि सर्पमित्र या सर्वांचा भेटवस्त देऊन सन्मान करण्यात आला
दिवाळी सणाचे निमित्ताने कॉलेज परिसर रहिवाशी संघ लांजा यांच्यावतीने गेल्या काही वर्षांपासून महावितरण, नगरपंचायत कर्मचारी यांचा सन्मान केला जातो. या वर्षी देखील हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कर्मचाऱ्यांसोबतच सर्पमित्र आदित्य कांबळे यांचा देखील सन्मान करण्यात आला. तसेच लांजा महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नव्याने निवड झालेल्या सुवर्णा पाटील देऊस्कर यांचाही सन्मान कॉलेज परिसर रहिवासी संघाच्या वतीने करण्यात आला..
यावेळी कॉलेज परिसर रहिवासी संघाचे श्री. वडके मुबारक शेख, चंद्रकांत कदम, सुनील देवलेकर, श्री कुलकर्णी गुरुजी, शुभम चव्हाण दिलीप उर्फ भाई चौगुले, मंगेश मोरे, मारुती पाटील आदी उपस्थित होते