द्वितीय क्रमांक कुडाळ श्री देवी केळबाई मित्र मंडळ व तृतीय क्रमांक कुडाळ बाजार पेठ यांनी मिळवला

कुडाळ l प्रतिनिधी :आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित नरकासुर वध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नेरूर येथील श्री देव कलेश्वर मित्र मंडळाने पटकावला तर द्वितीय क्रमांक कुडाळ श्री देवी केळबाई मित्र मंडळ व तृतीय क्रमांक कुडाळ बाजार पेठ यांनी मिळवला. या स्पर्धेला स्पर्धक आणि प्रेक्षकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आमदार निलेश राणे पुरस्कृत व कुडाळ शहर शिवसेना आयोजित नरकासुर वध स्पर्धा गेली २ वर्ष घेतले जात आहे या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष स्पर्धेमध्ये एकूण १० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, यांच्या हस्ते झाले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, कुडाळ शहर प्रमुख व नगरसेवक अभिषेक गावडे, गटनेता विलास कुडाळकर, महिला शहर प्रमुख व नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेवक राजीव कुडाळकर, उदय मांजरेकर, माजी सरपंच अरविंद शिरसाट, सुशील कदम, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, माजी नगरसेवक राकेश कांदे, राकेश नेमळेकर, प्रथमेश कांबळी, चेतन पडते, राजवीर पाटील, संदेश सावंत, राजाराम गडेकर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले की अशा प्रकारची स्पर्धा भरवणे आणि टिकवणे सोपे काम नव्हे. पण शहर प्रमुख अभिषेक गावडे व त्यांचे सहकारी ही स्पर्धा सातत्याने भरवत आहे हे कौतुकाचे आहे. ही स्पर्धा फक्त नरकासुर दाखवणे नाही तर नरकासुराची जी प्रवृत्ती आहे त्याचा नाश करणे हे महत्त्वाचे आहे आपल्या जीवनातही अशा अनेक प्रकारच्या नरकासुररुपी प्रवृत्ती असतात त्या प्रवृत्ती या दिवशी जाळून नव्याने आपले जीवन जगणे हे गरजेचे असते श्रीकृष्णाने आणि सत्यभामाने नरकासुराच्या अहंकाराला मारले आपल्यातील अहंकाराला सुद्धा आपण संपवले पाहिजे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्पर्धेचे परीक्षण राहुल मोंडकर, स्वप्निल तारी यांनी केले तर निवेदन नागेश नेमळेकर यांनी केले.













