वालावल-हुमरमळा (गाळवणीवाडी) येथील प्रमिला कानडे यांचे निधन

कुडाळ :      वालावल-हुमरमळा (गाळवणीवाडी) येथील सौ. प्रमिला पुरुषोत्तम कानडे (वय ५४) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सून असा परिवार आहे. त्या कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेतील कला शिक्षक प्रसाद कानडे यांच्या मातोश्री होत.

सौ. प्रमिला कानडे या अत्यंत सालस, सोज्वळ, मनमिळाऊ व परोपकारी स्वभावाच्या म्हणून परिसरात परिचित होत्या. सामाजिक जिव्हाळा जपणाऱ्या त्यांच्या प्रेमळ वागणुकीमुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. त्यांच्या अकाली निधनाने हुमरमळा (गाळवणीवाडी) परिसरात हळहळ व्यक्त होत असून विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.