पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती; नगरपरिषदतर्फे जय्यत तयारी सुरू
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नगरपालिकेची १५० वर्षांपूर्वीची इमारत आता पाडली जाणार असून त्या ठिकाणी अद्यावत अशी नवीन इमारत बांधली जाणार आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवार दि. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे.
सध्या चिपळूण नगरपालिकेचा कारभार बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र या दोन ठिकाणी विभागला गेला आहे. भूमिपूजन झाल्यानंतर येत्या दोन ते अडीच वर्षात ही इमारत उभी राहील असा विश्वास नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी व्यक्त केला आहे. नगरपालिका प्रशासनातर्फे भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून पालकमंत्री उदय सामंत यांच्या सोबत राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला चिपळूणमधील सर्व लोकप्रतिनिधी, माजी नगराध्यक्ष आणि नागरिकांना निमंत्रित करण्यात येत आहे.













