वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले शहरातील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ राऊळवाडा या मंडळाचे काम हे नेहमी आदर्शवत असेच असते. रक्तदान शिबिर असो, आरोग्य शिबिर असो किंवा सामाजिक उपक्रम असो मंडळ नेहमीच पुढाकार घेत असते. यावर्षी मंडळाने नरकासुर स्पर्धेत मिळालेल्या प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाच्या रकमेतून जीवनावश्यक वस्तू खरेदी करून ते संविता आश्रम ( पणदूर ) कुडाळ यांना भेट दिले.
जबरदस्त मित्रमंडळाने यावर्षी मोठा आकर्षक नरकासुर बनविला होता. त्यांनी नरकासुर स्पर्धेत सहभाग घेतला. या नरकासूर स्पर्धा मध्ये मिळालेल्या प्रथम पारितोषिक रक्कमेतून जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या. आणि सामाजिक बांधिलकी म्हणून या वस्तू संविता आश्रम ( पणदूर ) कुडाळ यांना भेट दिल्या. यावेळी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळाच्या या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.













