हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मालवणात शिवसेनेच्या वतीने विनम्र अभिवादन!

मालवण | प्रतिनिधी : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मालवण येथील आमदार निलेश राणे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करत त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

या प्रसंगी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजू बिडये, नगरसेवक महेश कांदळगावकर, सिद्धार्थ जाधव, नगरसेविका मेघा सावंत, अभय कदम, शिवाजी केळूसकर आदी उपस्थित होते.