आदिनाथ कपाळे यांचे विशेष प्रयत्न आले कामी
राजापूर (वार्ताहर): अपघातग्रस्त उपाध्ये कुटुंबियांच्या देवासारखे धाऊन जात माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि त्यांचे खासगी सचिव आदिनाथ कपाळे यांनी त्यांना मुख्यमंत्री सहायत्ता निधीमधुन दोन लाखाची मदत मिळवून देत उपाध्ये कुटुंबियांना मोठा आधार दिला आहे. त्यांच्या या मदतीचे सर्व थरातून कौतुक होत आहे.
खारेपाटण मधील मूळ रहिवासी असलेले आणि सध्या गिजवणे ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथे वास्तव्यास असलेले नीलकुमार सुभाष उपाध्ये हे आपली पत्नी, तीन मुले व वडील सोबत कारने गावी जात असताना त्यांच्या गाडीला गडहिंग्लज येथे अपघात झाला व या अपघातात ते गंभीर जखमी झाले. तात्काळ त्यांना कोल्हापूर येथील सिद्धांत हॉस्पिटल उपचारा करीत ऍडमिट करण्यात आले. तेथे उपचार दरम्यान मेडीकल व इतर रिपोर्ट- हॉस्पिटल बिल असे एकूण अंदाजे खर्च ४,५०,०००/रु. इतके होत होता. वडील व पत्नी व मुलगी यांना मार जबर लागल्याने यांच्या वरील उपचार खर्च वाढला, बिल वाढत असल्याने त्यांना कुठलाच मार्ग सापडत नव्हता. तेव्हा तुळसवडे गावचे सुपुत्र, समाजिक कार्यकर्ते, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे खासगी सचिव असलेले आदिनाथ कपाळे यांना अपघाताची बातमी समजताच त्यांनी तात्काळ उपाध्ये कुटुंबीयांना संपर्क साधून विचारपुस केली आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत करण्याचे ठरले.
परंतु हा खर्च मुख्यमंत्री सहायता निधी योजनेमध्ये बसत नसल्याने मा.आ. सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता पत्र तयार करून त्या पत्रावर मुख्यमंत्री साहेबांची “विशेष बाब” सही घेतली आणि आदिनाथ कपाळे यांनी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने त्याचा पाठपुरावा करून २ लाखाचा निधि उपलब्ध करून दिला.
आरोग्य सेवेचा हा यज्ञ अविरतपणे चालू ठेवल्याबद्दल आणि त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळाल्याबद्दल उपाध्ये कुटुंबीयांनी माजी राज्यमंत्री मा.आ. सदाभाऊ खोत यांचे व त्यांचे स्वीय सहाय्यक आदिनाथ कपाळे यांचे आभार मानले.











