रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील गावडे आंबेरे-सांडमवाडी येथे किरकोळ कारणातून तरुणावर चाकूने सपासप वार केले.ही घटना सोमवार 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वा.याप्रकरणी एकावर पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय अशोक हळदणकर (25,रा.सांडमवाडी गावडेआंबेरे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्या विरोधात जखमी प्रथमेश मंदार तिवरेकर (23,रा.सांडमवाडी गावडेआंबेरे,रत्नागिरी) याने पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानूसार,सोमवारी दुपारी 2 वा.सुमारास हे दोघेही गावडेआंबेरे एसटी स्टॉपवर असताना त्यांच्यात एकमेकाची मस्करी सुरु होती.या कारणातूनच त्यांच्या वाद झाला होता.त्याचा राग मनात ठेवून संशयित अक्षय हळदणकरने सोबत लपवून आणलेल्या चाकूने प्रथमेशच्या उजव्या काखेत,उजव्या हाताच्या खांद्यावर आणि त्याच खांद्यावर पाठीमागे सपासप वार केले.जखमी प्रथमेशला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी संशतिय अक्षय विरोधात भादंवि कायदा कलम 326 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल पी.टी.कांबळे करत आहेत.











