माडखोल । प्रतिनिधी :
माडखोल वरची धवडकी येथे आज संध्याकाळी ठीक ७ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलस्वार आणि पादचारी महिला यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात रजनी राजेश शिरवणकर ( ४६, राहणार धवडकी माडखोल) या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडीहून चंदगडच्या दिशेने जाणारी मोटारसायकल धवडकी येथे आली असता, रस्ता ओलांडत असलेल्या रजनी शिरवणकर यांना मोटारसायकलची जोरदार धडक बसली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच तातडीने माडखोल सेवा संघाच्या रुग्णवाहिकेतून जखमी महिलेला उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील तसेच माडखोल बीटचे हवालदार दिपक शिंदे घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी चंदगड येथील मोटारसायकलस्वारालाही आपल्या वाहनातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.












