अनधिकृत वाळू वाहतुक | मालवण महसूल विभागाचा दणका!

कोळंब खडवण नाका येथे पहाटे धडक कारवाई; तीन डंपर जप्त

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू वाहतुकीवर महसूल विभागाने शनिवारी पहाटे धडक कारवाई केली. तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे सुमारे ३.३० वाजता कोळंब खडवण नाका येथे ही कारवाई करण्यात आली. यावेळी अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्त करण्यात आले.

 

मंडळ अधिकारी दीपक शिंगरे (मसुरे), मीनल चव्हाण (कोळंब), उमेश सिंगनाथ (आचरा), स्वप्नात जंगले (सुकळवाड), ग्राम महसूल अधिकारी खुलपे व गुरव तसेच महसूल सेवक सत्यवान पाताडे, वैभव मसुडगे आणि संतोष चव्हाण, पोलीस पाटील हेमंत परब उपस्थित होते. हे महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

GA 04 T 3851, GA 04 T 3147, MH 07 AQ 8118 या डंपरवर कारवाई करण्यात आली अशी माहिती देण्यात आली.