अणसूर ग्रामपंचायतचा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कडून विशेष सन्मान….

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल केले कौतुक

वेंगुर्ले : दाजी नाईक
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल अणसूर ग्रामपंचायतचा जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्ग नगरी येथे आज झालेल्या या सन्मान सोहळ्यात ग्रामपंचायत सरपंच सत्यविजय गावडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी हा गौरव स्वीकारला.

हा विशेष सन्मान करताना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साहिल, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड मॅडम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश परब तसेच जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अणसूर ग्रामपंचायतचा गौरव करण्यात आला.

हा सन्मान स्वीकारताना अणसूर ग्रामपंचायतचे सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, सदस्य, सुधाकर गावडे, वामन गावडे, संयमी गावडे, सीमा गावडे, साक्षी गावडे, प्रज्ञा गावडे, आशासेविका अनुष्का तेंडोलकर, मदतनीस अन्नपूर्णा गावडे, ग्रामस्थ किरण मालवणकर आदी उपस्थित होते.

गावातील स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामध्ये सर्वांच्या सांघिक प्रयत्नांमुळेच जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवता आल्याची भावना यावेळी सरपंच यांनी व्यक्त केली.