ओटवणे गावचे ग्रामदैवत श्री रवळनाथ जत्रौत्सव आज

L . ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे येथिल जागृत देवस्थानच्या वार्षिक जत्रौत्सवाला आज पासून मोठया उत्साहात प्रारंभ होत आहे. आज मंगळवारी श्री देव रवळनाथाचा जत्रौत्सव पार पडणार आहे.त्या दिवशी दिवसभर ओटी भरणे साकडे घालणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम तसेच रात्री उशिरा मंदिराभोवती ढोल ताशाच्या गजरात पालखी प्रदक्षिणा सोहळा पार पडणार आहे त्यानंतर मध्यरात्री गावातील स्थानिक दशावतार कलाकारांचा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे आणि या पहिल्या जत्रेची सांगता होणार आहे.त्यानंतर जत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हरीनाम सप्ताहाला प्रारंभ होणार आहे.रात्री कुळघर गावठणवाडी ते रवळनाथ मंदिर अशी दिंडी वाजत गाजत निघणार आहे.गुरुवारी या सात प्रहराच्या सप्ताहाची सांगता होणार आहे.

      दुसरी जत्रा म्हणजे सातेरी जत्रौत्सव रविवारी २९ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडणार आहे. दिवसभर ओटी भरणे, साकड घालणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम पार पडणार आहे उशिरा पालखी प्रदक्षिणा सोहळा आणि मध्यरात्री आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. यानंतर जत्रौत्सवाची सांगता होणार आहे. या जत्रोत्सवाला भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्थानिक देवस्थान कमिटी कडून करण्यात आले आहे.