खोटे नरेटिव्ह पसरवणाऱ्यांवर आमदार निलेश राणेंचा घणाघात!

‘गिरे तो भी टांग उपर’ अशी काहींची अवस्था

मालवण किनारपट्टीसाठी सकारात्मक निर्णय 

दोन दिवसांत पत्रकार परिषदेतुन मांडणार सविस्तर भूमिका !

मालवण | प्रतिनिधी : मालवणमधील सीआरझेड आणि किनारपट्टीवरील बांधकामांच्या संदर्भातील प्रकरण न्यायालयाने फेटाळल्यानंतरही काहीजण जाणीवपूर्वक खोटे नरेटिव्ह पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यायालयीन निर्णयानंतरही वस्तुस्थिती स्वीकारण्याची त्यांची तयारी नाही. ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी काही लोकांची अवस्था झाली आहे, अशा शब्दांत आमदार निलेश राणे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

 

मालवणच्या किनारपट्टीसाठी न्यायालयाचा हा निर्णय किती सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण आहे, याची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्यासाठी येत्या दोन दिवसांत सविस्तर पत्रकार परिषद घेणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले.