देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त अभ्यासिका उभारण्यात येत आहे. पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.सध्या अभ्यासिकेचं काम युद्धपातळीवर चालू आहे
या अभ्यासिकेमध्ये एमपीएससी, यूपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मात्र, अभ्यासिकेची उभारणी करताना विद्यार्थ्यांच्या नेमक्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन सुविधांचा समावेश करण्यात यावा, या उद्देशाने विद्यार्थ्यांकडून सूचना व प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.नगरपंचायत कार्यालयात किंवा खालीलं WhatsApp नंबरवर पाठव्याव्यातं
📞87672 30780
📞8767722602
याबाबत प्रभागाच्या नगरसेविका तथा पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर आणि देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. अभ्यासिकेमध्ये कोणत्या सुविधा असाव्यात, कोणती पुस्तके, संदर्भ साहित्य तसेच इतर कोणत्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात, याबाबत विद्यार्थ्यांनी आपले प्रस्ताव व सूचना मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या सूचनांचा विचार करून अभ्यासिका अधिक उपयुक्त आणि सर्वसमावेशक बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे देवगड परिसरातील एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या सूचना द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.













