संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
कणकवली : भारतीय संविधान दिनानिमित्त कणकवली शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतीय संविधानाने देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची दिशा दिली आहे. या मूल्यांच्या आधारावर भारतीय लोकशाही अधिक मजबूत आणि एकसंघ ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संविधान करते. संविधानातील मूलभूत तत्त्वांचे जतन करणे आणि त्यांचा आदर राखणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे संविधान दिन प्रत्येकाने सन्मानाने आणि उत्साहाने साजरा करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा परिषद सदस्य शीतल दळवी, गौतम खुडकर, संदीप सावंत, निसार शेख, समीर प्रभुगावकर, सर्वेश दळवी, पप्पू पुजारे, महेश सावंत, सागर राणे, मिथुन ठाणेकर, इम्रान शेख, बाबजी चव्हाण, गणेश तळगावकर, सुभाष मालंडकर, सत्यवान राणे, नयन दळवी, अमोल रासम, राजू चव्हाण, सिद्धेश वालावलकर आणि मिलिंद चिंदरकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













