ओटवणे गावचा जत्रौत्सव आज २९ नोव्हेंबर रोजी.

ओटवणे (प्रतिनिधी )

ओटवणे सातेरी रवळनाथ पंचायतन जागृत देवस्थान मधील दुसरी जत्रा म्हणजे देवी सातेरीची जत्रा आज रविवारी २९ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला प्रारंभ झालेल्या श्रीं देव रवळनाथाच्या पहिल्या जत्रौत्सवापासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. आज सातेरी च्या जत्रौत्सवाला मोठया संख्येने भाविक, ग्रामस्थ माहेरवाशीनी उपस्थित राहणार आहेत. मंदिरात दिवसभर देवीची ओटी भरणे, साकड घालणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम पार पडणार आहेत.उशिरा ढोल ताशाच्या गजरात पालखी प्रदक्षिणा सोहळा व त्यानंतर मध्यरात्री आरोलकर दशावतार नाट्य मंडळ आरवली या दशावतार मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे.आणि या जत्रौत्सवाची सांगता होणार आहे. जत्रौत्सवास भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्थानिक देवस्थान कमिटी, देवस्थान मानकरी यांसकडून करण्यात आले आहे.