मालवणातील युवकाने साकारले निलेश राणे यांचे हुबेहूब व्यक्तिचित्र

निलेश राणे यांना भेटून व्यक्तिचित्र दिले भेट

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर देऊळवाडा येथील रहिवाशी व सावंतवाडी येथील आर्ट कॉलेजचा विद्यार्थी युवा चित्रकार निलेश संतोष चव्हाण यांने भाजप नेते निलेश राणे हुबेहूब व्यक्तिचित्र साकारलेआहे. मंगळवारी निलेश राणे यांना भेटून निलेश चव्हाण यांनी व्यक्तिचित्र भेट दिले. दरम्यान, निलेश राणे यांनी निलेश चव्हाण यांचे विशेष कौतुक यावेळी केले.

निलेश चव्हाण याला शालेय जीवनापासून चित्रकलेची आवड आहे. सध्या सावंतवाडी येथील बांदेकर आर्ट कॉलेज येथे दुसऱ्या वर्षाला तो शिक्षण घेत आहे. याच क्षेत्रात आपण करियर करणार आहे. निलेश राणे यांचे व्यक्तिमत्त्व आपल्याला आवडते. त्यातून प्रेरित होत आपण हे चित्र साकारले असल्याचे निलेश चव्हाण यांनी सांगितले.

मालवण येथील निलरत्न निवासस्थानी निलेश राणे यांची भेट घेऊन निलेश चव्हाण यांनी व्यक्तिचित्र भेट दिले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, दादा साईल, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, महेश मांजरेकर, महेश सारंग, ललित चव्हाण, संतोष गांवकर, ऋतू देसाई आदी उपस्थित होते.