सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळावे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळावे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मागणी

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्याकडे केली मागणी

कुडाळ प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी अवजारे व यंत्रसामग्री करिता देण्यात येणारे अनुदान अद्याप मिळालेले नाही तरी हे अनुदान लवकरात लवकर मिळावे असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कृषी केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांना निवेदन दिले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या कृषी अवजारे व यंत्रसामुग्री करिता अनुदान दिले जात होते मात्र गेले काही महिने या शेतकऱ्यांना हे अनुदान प्राप्त झालेले नाही या अनुदानापासून जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहिले आहेत याबाबत संदर्भ जिल्ह्यातील स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवेदन दिले होते या निवेदनाच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कृषी केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांना निवेदन दिले असून या निवेदनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत त्यांना लवकरात लवकर अनुदान देण्यात यावे त्यासंदर्भात कृषीच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात यावे असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निवेदनात म्हटले आहे.